मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर आज दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.. आजपासून मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर आयटीएमएस प्रकल्प राबवण्यास सुरुवात होणार आहे.. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आयटीएमएस प्रकल्प राबवण्यास सुरुवात होतेय.. या दोन तासांसाठी जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वाहतूक वळवली जाणार आहे... मुंबई पुणे एक्स्प्रेस वे महाराष्ट्रातल्या दोन महानगरांना जोडणारा दुवा. मात्र हाच दुवा प्रवाशांच्या जीवावर उठलाय. विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूनंतर या महामार्गाच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर विरोधकांनी यावरुन गदारोळही केला. त्यानंतर सरकारने तात्काळ पावले उचलत इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला. ३४० कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील ११५ कोटी उभारणीसाठी तर उर्वरित २२५ कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणार आहेत. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे.