टीकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय.. गोव्यातील 'त्या' पार्टीतला व्हिडीओ 'माझा'च्या हाती लागलाय.. सोनाली फोगाट यांचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळे झाला असून सोनालीच्या सहकाऱ्यांनीच जबरदस्तीनं ड्रग्ज दिलं असल्याचा संशय गोवा पोलिसांना आहे.. याप्रकरणी गोव्याच्या पार्टीतले सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.. दरम्यान सोनाली यांच्या सहकाऱ्यांनी कोणत्या ड्रग्जचा वापर केला याचा तपास सुरू असून सोनाली यांना क्लबपासून हॉटेलपर्यंत पोहोचवण्याऱ्या टॅक्सी चालकालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलंय....