गणपती स्पेशल ट्रेनना पालघरलाही थांबा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतलाय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. सणासुदीच्या काळात होणारी अतिरिक्त गर्दी सामावून घेण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आलं.