शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची यावरून राज्यात संघर्ष सुरू आहे. शिवसेनेतील ४० हून अधिक आमदार आपल्याकडे खेचल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आता शिवसेना पक्षावरच दावा ठोकला आहे. त्याबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशातच आता दसऱ्याच्या निमित्ताने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होताना पाहायला मिळत आहे.
#EknathShinde #UddhavThackeray #ShivSenaDasraMelava #ShivajiPark #Dadar #BalasahebThackeray #ShivSenaMelava #BJP #DevendraFadnavis #AadityaThackeray