मी कोणालाही व्यक्तिगत नाव ठेवत नाही. एका घरात जर राजकारण शिरलं तर घोटाळा होतोच होतो. आजोबा आमदार, बाप आमदार आणि नातू पण आमदार अशी महाराष्ट्रात दीडशे घराणी आहेत. ही लोकं राजकारणातून हलायला तयार नाहीत. मोहिते पाटील, पतंगराव कदम, बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज बाबा हलत नाहीत. अशी घराणे नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत मोजली तर शंभर ते सव्वाशे निघतील. 288 मतदारसंघातले 125 बाजूला काढा. राहिलेल्या खऱ्या निवडणुका. आणि यातूनच ठरवायचं शिवसेना पुढं का भाजप पुढं, असं परखड मत शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलं.
#EknathShinde #Lalbaug #Parel #Ganeshutsav #Ganpati #Celeberations #Festival #Mumbai #Maharashtra #HWNews