यंदा शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं असून पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आता खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा ऐतिहासिक ठरणार हे निश्चितच होतं. पण तरी हा मेळावा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे घेणार की एकनाथ शिंदे घेणार हाही प्रश्न होताच. पण आता हा दसरा मेळावा एकनाथ शिंदेच घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
#UddhavThackeray #EknathShinde #RajThackeray #MNS #DasaraMelava #ShivajiPark #BJPShivsena #Maharashtra #Dussehra #DevendraFadnavis #BalasahebThackeray #HWNews