मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसनेच्या ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दर्शवला. सध्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत अगदी बोटावर मोजणी इतकी आमदार राहिलेत. महाराष्ट्रात सध्या उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे गट अन भाजप असा सामना पाहायला मिळत आहे.भाजपचे आमदार आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे , तुमच्या पक्षाला 'पेंग्विन सेना ' म्हणायचं का ? असा सवाल पत्राद्वारे उद्धव ठाकरे यांना केला आहे.
#EknathShinde #UddhavThackeray #BJP #Shivsena #DevendraFadnavis #MLA #AshishShelar #HWNews