राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं विधान मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच या भेटीनंतर खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यताही व्यक्त केली होती, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर खडसे खरचं भाजपमध्ये जाणार का? अशा चर्चा राजकीय क्षेत्रात रंगू लागल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. यावर आता एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.