महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खरी शिवसेना कुणाची ही अस्तित्त्वाची लढाई सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी कायदेशीर लढाई मागील काही महिनांपासून सुरू आहे. आता घटनापीठासमोर या दोन्ही गटाचे दावे- प्रतिवादे ऐकल्यानंतर प्रकरण महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहचले आहे.