पुण्यातील (Pune) चांदणी चौकातील (Chandani Chowk) पूल काही दिवसांपूर्वीच मध्यरात्री स्फोटके लावून पाडण्यात आला. मात्र पहिल्याच स्फोटामध्ये हा पुल पूर्णतः कोसळला नाही. या घटनेनंतर या पुलाच्या मजबुतीवर चर्चा सुरू झाली. आणि या पुलाच्या मजबुतीचा मुद्दा प्रकाशात आला. हा पुल बार्ली इंजिनिअर्स कंपनीच्या सतीश मराठे आणि अनंत लिमये यांनी बांधला होता. नेमकं या पुलाबद्दल मराठे काय म्हणाले आहेत पाहुयात.