सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरात एक विधान केले आहे. जातीपाती समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे की, ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांची केवळ माफी मागून चालणार नाही. तर, या समाजघटकांसोबत आपण व्यवहार कसा करतो, यावर सर्व अवलंबून आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी