पुण्यातील चांदणी चौकातील रस्ता रुंदीकरणासाठी आज आणखी एक स्फोट करण्यात आला. या स्फोटात रस्त्याच्या कडेला असलेला टेकडीचा भाग पाडण्यात आला. त्यासाठी काही मिनिटं महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र थोड्याच वेळात ती पुन्हा सुरु करण्यात आली. चांदणी चौकातील जुना पुल पाडण्यात आल्यानंतर रस्त्याच्या रुंदीकरणाला वेग आला असून त्यासाठी अधुन मधुन असे स्फोट घडविण्यात येतायत.