८०च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर गेली काही वर्ष मोठ्या पडद्यावर झळकल्या नाहीत. जवळजवळ ८ वर्ष चित्रपटांपासून दूर होत्या. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शेर शिवराज' चित्रपटापासून त्यांनी मोठ्या पडद्यावर नवी इनिंग सुरु केली. परंतु गेली काही वर्ष चित्रपटात काम न करण्याचं कारण त्यांनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'च्या मुलाखतीमध्ये उघड केलं आहे. त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेल्या 'हवाहवाई' चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी आणि संपूर्ण टीमने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'वर हजेरी लावली आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या.