ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिका आयुक्त आणि राज्य सरकारवर टीका केली. ऋतुजा रमेश लटके यांनी नियमाने राजीनामा दिला. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नाही. महापालिकेची कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. तरीही त्यांचा राजीनामा मंजूर केला नाही, असं अनिल परब यांनी सांगितलं. तसंच ऋतुजा लटके यांना शिंदे गटाकडून मंत्रीपदाची ऑफर देण्यात येत असून त्यांना आपल्याकडे ओढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरू असल्याचा दावाही अनिल परब यांनी केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#DevendraFadnavis #AnilParab #UddhavThackeray #BJP #RutujaRameshLatke #Andheri #Bypoll #ShivSena #BJP #EknathShinde #BMC #ThackerayVsShinde