राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं पण नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी मित्रपक्षांपैकी ज्यांनी या नव्या सरकारला समर्थन दिलं अशा आमदारांना मंत्रीपदं मिळणार का? याची मोठी चर्चा पाहायला मिळाली. पण यामध्ये सर्वात चर्चेत राहिले ते म्हणजे प्रहारचे आमदार बच्चू कडू! महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेल्या बच्चू कडू यांनी बंडाच्या सुरुवातीपासूनच नव्या सरकारला प्रत्यक्ष पाठिंबा दिला. बच्चू कडू यांना कन्फर्म मंत्रिमंडळात स्थान मिळणार असं म्हंटलं जात होतं. पण मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेल्या बच्चू कडू यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
#BacchuKadu #EknathShinde #DevendraFadnavis #CabinetExpansion #Prahar #CabinetMinister #BJP #ShivSena #MVA #HWNews