राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडीना वेग आला आहे. त्याचबरोबर आरोप प्रत्यारोप टीकाही मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. अशातच नुकतेच रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राज्यात जे राजकारण सुरू आहे, ते असेच सुरू राहिले तर लोकशाही टिकणार नाही, त्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसने पुढे आले पाहिजे असं म्हंटले होते. त्यावरती शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी पलटवार केला आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी रामराजे यांच्या या विधानावर बोलताना राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही असा दावा केलाय.
#SharadPawar #NCP #ShambhurajDesai #EknathShinde #NanaPatole #DevendraFadnavis #PrithvirajChavan #Congress #RishiSunak #Maharashtra