हर हर महादेव या चित्रपटावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. याला आता राजकीय वळण येताना पाहायला मिळत आहे. अशात रात्री उशीरा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यात एका चित्रपटगृहात जावून हर हर महादेव या सिनेमाचा शो बंद पाडला. त्यानंतर शोचे पैसे परत करण्याची मागणी करणाऱ्या प्रेक्षकाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचं एक व्हिडीओ समोर आला आहे.