अभिजित देशपांडे दिग्दर्शित हर हर महादेव चित्रपटावरून वाद सुरु झालाय, अनेक ठिकाणी शो बंद पाडण्यात आले, ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शो बंद पडला, यावेळी मोठा राडा झाला, यावर उपस्थित प्रेक्षकाने आमचे पैसे परत द्या अशी मागणी केली, यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली, यावर चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत आव्हाडांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली.