काँग्रेस खासदार राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मागील दोन महिन्यांपासून सुरुय.... कन्याकुमारीपासून या यात्रेला सुरुवात झालीय...ही यात्रा नुकतीच तेलंगणाहुन महाराष्ट्रात दाखल झाली... माध्यमांनी जरी या यात्रेबद्दल जास्त दाखवलं नसलं तरी आतापर्यंत या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे...तर दुसरीकडे याच भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात युवक सहभागी होत असल्याचं दिसून येत आहे....तर तिकडे भाजपाकडून या यात्रेवर टीकेची झोड उठवली जात आहे... ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या मुलांना लाँच करण्यासाठी असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीय... खरंच भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आपल्या मुलांना राजकारणात लाँच करण्यासाठी प्रयत्न करतायत का..? गांधी घराण्यानं काँग्रेस पक्षाध्यक्ष पद सोडल्यानंतरही काँग्रेसच्या महाराष्ट्रातील राजकारणात घराणेशाही टिकून राहणार का? याच प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा...