कुत्रे पाळण्यासाठी महापालिकेचा परवाना घ्यावा लागतो, त्याच पद्धतीने आता घरात मांजर पाळण्यासाठी परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली. दरम्यान, पुढील आठ दिवसात मांजराचा परवाना घेण्याची प्रक्रिया आॅनलाइन केली जाणार आहे.