राज्यपाल भगतसिंग कोश्यारींविरोधात मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं.
हुतात्मा चौक परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली.
काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात येतंय.