राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याबाबत बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की 'आपले राज्यपाल देखील खासगीत सांगतात की त्यांना त्यांच्या राज्यात परत जायचं आहे. त्यामुळेच आपल्या राज्यात परतण्यासाठी राज्यपालांकडून अशी विधानं केली जात आहेत का? ते मुद्दाम असं बोलत आहेत का, असा प्रश्न पडतो'.