प्रतापगडावर झालेल्या शिवप्रताप दिनाला मला कोणाचाही निरोप आला नसल्याने मी प्रतापगडावरील कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकलो नाही असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी काल आयोजित केलेला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले होते.त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांचे धाकटे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टीका केली ते म्हणाले 'आपण ज्या घराण्याचे वारस आहोत त्याच घराण्यातील कार्यक्रमाला आपल्याला कोणी बोलवण्याची गरज काय आपण घराण्यातील वारस म्हणून या कार्यक्रमाला येणे अपेक्षित होते'