महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का अश्या चर्चा अधून मधून राज्यात होत असतात. पण आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचे कारण ठरतोय. २ दिवसांपूर्वी म्हणजे बुधवारी, उद्धव ठाकरे लहुजी वस्तादांच्या जयंती कार्यक्रमात सामील झाले होते. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि आपल्याला कर्तृत्ववान व्यक्ती मुख्यमंत्री पदावर बसवायचा आहे. मग तो पुरुष असो किंवा स्त्री. त्यांच्या भाषणातील हा जरी किरकोळ मुद्दा असला तरी सांकेतिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. भारतात आजपर्यंत १५ पेक्षा जास्त महिला मुख्यमंत्री होऊन गेल्या आहेत. अगदी अलीकडचेच उदाहरण द्यायचे झाले तर पपश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्ज, उत्तर प्रदेश मध्ये मायावती, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सिंदिया, तामिळनाडू मध्ये जयललिता अशा अनेक महिला मुख्यमंत्री आपण पाहिल्या आहेत. पण देशात progressive स्टेट म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रात आजवर २० मुख्यमंत्री झाले, पण त्यात एकही महिला नाहीये. बरे आणि राज्यात सक्षम महिला नेतृत्व नाहीये असाही काही प्रकार नाहीये. त्यामुळेच कि काय पुन्हा एकदा महिला मुख्यमंत्र्यांच्या चर्चेला उधाण आलेय. जर या बाबतीत गंभीरपणे विचार केला तर कोण अशा महिला नेत्या आहेत ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवू शकतात? कोण होऊ शकतात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?
#UddhavThackeray #SupriyaSule #RashmiThackeray #ShivSena #NCP #BJP #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #PankajaMunde #WomanCM #YashomatiThakur #NeelamGorhe #MVA #Congress #HWNews