सध्या गुजरातमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशात प्रचारा दरम्यान होत असलेल्या भाषणामधून काँग्रेस भाजपा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वीच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रावण म्हणत टीका केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा खर्गेंनी मोदींवर निशाणा साधलाय.