समृद्धी महामार्गावर गाडी दामटायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे वेळच वेळ आहे, मात्र सरकार शेतकऱ्यांची वीज कापत आहे त्याच काय? असा संतप्त सवाल करत स्थानिक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समृद्धी महामार्गावर काळे झेंडे दाखवले. नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाची पाहाणी करण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जालना जिल्ह्यात प्रवेश केल्यावर स्थानिक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन केल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची पाहाणी करण्यासाठी स्वतः गाडी चालवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बाजूला बसलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांसह जालना जिल्ह्यात दाखल झाले खरे,पण इथे आल्यावर त्यांच्या आनंदावर स्थानिक शेतकऱ्यांनी पाणी फेरले.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ताफा पोहचताच स्थानिक शेतकऱ्यांनी सरकार कडून शेतकऱ्यांची वीज कापली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत या बद्दल संताप व्यक्त केला. यावेळी शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. तसेच ताफा अडवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु हा ताफा शेतकऱ्यांशी कुठलीच चर्चा न करता निघून गेल्याने शेतकरी नाराज झाले.
#Samruddhi #DevendraFadanvis #EknathShinde #SamruddhiMahamarg #HWNews #ShivSena #BJP #Maharashtra #Mumbai #Nagpur #Expressway