महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला असून त्यावर माजी मंत्री व कॉँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया मांडली आहे. 'सीमा प्रश्न हा बऱ्याच वर्षाचा आहे आता त्यांनी वेगळं वळण घेतलं आहे. आतापर्यंत कधी घडलं नव्हतं ते आता घडत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या गावासंदर्भात बोलत आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात योग्य ठोस उत्तर देत नाही, जनतेचा मुख्यमंत्री व सरकारवरील विश्वास उडत आहे', अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यसरकारवर केली.