शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर घणाघाती आरोप केला होता. आप आणि भाजपा यांच्यात साटं-लोटं आहे. त्यामुळे दिल्लीत आप जिंकला आणि गुजरातमध्ये भाजपा जिंकला. तशी डील दोन्ही पक्षात झाली असल्याच्या चर्चा आहेत, असे ते म्हणाले होते. यावर भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी त्यांना प्रत्युत्तर देत "मुंबई पालिकेच्या निवडणुकीत आता भाजपाचा प्रमुख विरोधक आम आदमी पार्टीच असेल, कारण इतर पक्ष आता खिजगणतीतही नाही असंच चित्र दिसतंय", असा टोला लगावला. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मात्र फडणवीसांनी आपवर टीका केली आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
#AshishShelar #DevendraFadnavis #AAP #SanjayRaut #UddhavThackeray #Shivsena #BMCElections #Politics #GujratElections #Maharashtra #ArvindKejriwal