राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी कोणत्या संदर्भात हे वक्तव्य केलं मला माहिती नाही. मी चंद्रकांत पाटलांशी बोलेन आणि त्यांची भूमिका समजून घेतल्यावरच बोलेन, असं मत विखेंनी व्यक्त केलं. तसेच महापुरुषांबद्दल कोणीही अनुद्गार काढणार नाही, असंही नमूद केलं.