राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. चंद्रकांत पाटील यांच्यावर पुणे जिल्ह्यातील पिंपरी शहरात शाईफेक करण्यात आलीय. चंद्रकांत पाटील यांनी काल भाषण करताना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं होतं. शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी महापुरुषांनी भीक मागतल्याचं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका झाल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली होती. पण त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहे. त्यांच्यावर पिंपरीत शाईफेक करण्यात आलीय.शाईफेक करणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
#chandrakantpatil #pune #controversy #ink #babasahebambedkar #jyotibaphule #pimprichinchwad #bjp #maharashtra #protest #hwnewsmarathi