छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून पुण्यात बंद पाळण्यात येत आहे. यावेळी काढण्यात आलेल्या मूकमोर्चात भाजप खासदार उदयनराजे भोसले देखील सहभागी झाले होते. यावेळी उदयनराजे यांनी राज्यपालांवर निशाणा साधत सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.