२६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात बचावलेल्या नर्स अंजली कुलथे यांनी त्यावेळी घडलेल्या एका आठवणीला उजाळा दिला. यात त्यांनी हल्ल्यानंतर पोलिसांनी कसाबच्या ओळख परेडसाठी बोलावल्याची घटना सांगितली. त्या म्हणाल्या, "मला जेव्हा कसाबला ओळखण्यासाठी बोलावण्यात आलं, तेव्हा कसाब हसला आणि म्हणाला की मी त्याला अगदी बरोबर ओळखलं आहे. तसेच तोच अजमल कसाब आहे. इतक्या लोकांचा जीव घेऊनही कसाबच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत नव्हता. त्यामुळे मला खूप दुःख झालं आणि रागही आला." अंजली कुलथे १६ डिसेंबरला एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.