मुंबईतील पवई भागात एक थरारक घटना घडली. वाहतूक कोंडी झालेली असताना एक वयोवृद्ध वाट काढत जात होता. मात्र, अचानक या व्यक्तीने एका बससमोरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला आणि बसचालकाला तो न दिसल्याने बसने थेट धडक दिली. विशेष म्हणजे बसने धडक दिल्यानंतर हा वयोवृद्ध थेट गाडीखाली गेला. मात्र, दोन्ही चाकांच्या मध्ये पडल्याने या व्यक्तीचा जीव वाचला.