आज १६ डिसेंबर... भारताच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिता येतंय असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आज ५१ वर्षांपूर्वी झालेच्या भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानचा अत्यंत वाईट पद्धतीने फक्त पराभव झाला होता, तर त्याचे दोन तुकडे सुद्धा झाले होते. आणि त्यामुळेच भारतात १६ डिसेंबर विजय दिवस साजरा केला जातो.