आज ज्यांच्या हातात सत्ता आहे, ती लोक वेगळ्या प्रकारची भाषा वापरत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणण्याचं काम शिवरायांनी केलं.पण, आज 350 वर्ष झाली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवरायांचं नाव घेतलं जात आहे. पण, राज्याच्या सरकारमधील मंत्री हे शिवरायांबद्दल वाटेल ते विधान करतो, अन्य कुणी काही तरी बोलतो. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. आज लोकशाही मार्गानं त्यांना कायमचा धडा शिकवायचा असून स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला आहे. ते महाविकासआघाडीच्या महामोर्चात बोलत होते