‘लव्ह जिहाद’ची प्रकरणं रोखण्यासाठी राज्य सरकारने अलीकडेच एक समिती स्थापन केली आहे. ही समिती घरापासून दुरावलेल्या आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या मुलींची माहिती घेणार आहे. ‘लव्ह जिहाद’बाबत कायदा पारित करण्यापूर्वी सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. हा कायदा आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करण्याऱ्या जोडप्यासांठी अडचणीचा ठरू शकतो, याबाबत चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी 'लोकसत्ता लोकसंवाद' या कार्यक्रमात स्पष्टीकरण दिलं आहे.