"२०१४ ते २०१९ चा काळ पुन्हा एकदा आपल्या राज्यात आला पाहिजे, किमान मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत." काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आणि राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली. विधिमंडळाच हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच बावनकुळे यांनी केलेल्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याआधीही भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी आम्ही छातीवर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलय, अस वक्तव्य केलं होत. त्यामुळे बावनकुळेंच्या सूचक विधानाने आता एकनाथ शिंदेंची खुर्ची जाणार का असा सवालसुद्धा उपस्थित केला जातोय. त्यातच शिंदे गट आणि भाजप आमदारांमधले वादसुद्धा समोर येत आहेत. दुरीकडे महाविकासघडिने तर शिंदे फडणवीस सरकारला फेब्रुवारी पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदें आता काहि दिवसांचे मुख्यंमत्री असणार का अशी चर्चा रंगू लागलेय. पण बावनकुळेंच्या वक्तव्याने एकनाथ शिंदेंपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच टेन्शन वाढण्याची चिन्ह जास्त दिसतायत. ते कस? या व्हिडिओतून जाणून घेऊ.
#EknathShinde #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #Nagpur #BJP #Maharashtra