कोयना धरणासाठी विस्थापित झालेल्यांना अजूनही जमिनीचे वाटप झालेले नाही. हे काम अद्याप सुरूच आहे. या प्रकरणात सोलापूरमधील एका अधिकाऱ्याने काही प्रकल्पग्रस्तांना एकाच जमिनीचे दोनदा वाटप केल्याचे नुकतेच समोर आले आहे. आज अधिवेशनात आमदार राम शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. संबधित अधिकाऱ्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली. यावर देण्यासाठी रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्री संदिपान भुमरे उत्तर दिले मात्र विरोधकांना ते उत्तर पटले नाही आणि सभागृहात एकचगोंधळ उधळा. शेवटी यात मुख्यमंत्र्यांना मध्यस्थि करावी लागली. संबधीत अधिकाऱ्यांची दोन महिन्यांत चौकशी करून दोषी आढळणाऱ्या त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करणार,"असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिले.
#EknathShinde #RamShinde #SandipanBhumre #ShivSena #BJP #Maharashtra #VidhanSabha #Parliament #WinterSession #HWNews