37 लाख शेतकऱ्यांना रेशनिंगचं धान्य देण्यासाठी आंदोलन करून सरकारला झुकवू, Ravikant Tupkar यांचा इशारा

HW News Marathi 2022-12-22

Views 61

राज्यातील 37 लाख रेशन कार्डधारक शेतकरी जे सध्या रेशनिंगच्या धान्यापासून वंचित आहेत, अशा शेतकऱ्यांची दखल घेऊन HW मराठीने बातमी केली. या बातमीची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर
यांनी दखल घेतली आहे. सन २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अकोला, अमरावती औरंगाबाद, बीड, बुलढाणा, हिंगोली ,जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद , परभणी वर्धा, वाशीम, यवतमाळ या १४ जिल्ह्यात अल्प भूधारक शेतकरी यांना apl ही शेतकरी योजना लागू करण्यात आलेली. एपीएल रेशन कार्डधारक असणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात येत होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून ही योजना बंद करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

#RavikantTupkar #DevendraFadnavis #Buldhana #RationCard #APLScheme #Farmers #Crop #Shetkari #Maharashtra #Farmers #Farming

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS