राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार निलेश लंके हे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर एकटेच उभे असलेले आज पाहायला मिळाले. 'बेरोजगारांना न्याय द्या' अशा आशयाचे फलक घेऊन निलेश लंके उभे असलेले पाहायला मिळाले. 'महाराष्ट्रासमोर बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. स्थानिक बेरोजगारांना न्याय मिळायला हवा असा कायदा झाला पाहिजे' अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस दिली.