झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम दरवेळी नवनवीन हास्याची मेजवानी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतो. यंदाच्या आठवड्यात खुद्द महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजेच रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझानं या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी जेनेलियाच्या मराठमोळ्या लूकनं उपस्थितांसह सर्वांनाच चांगलंच घायाळ केलं. यावेळी रितेश-जेनेलियासोबत अजय-अतुल या संगीतकार जोडीसह प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीही हजेरी लावलेली दिसली.