कर्नाटक सीमाप्रश्नावर राज्य सरकारने विधानसभेत ठराव आणावा, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षांनी सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत केली. त्यानंतर आज किंवा उद्या विधानसभेत ठराव आणण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री दिल्लीला गेले असल्याने सोमवारी हा ठराव मांडता आला नाही. आता मंगळवारी हा ठराव मांडण्यात येण्याची शक्यता आहे.सीमाप्रश्नावर सरकार तसुभरही मागे हटणार नाही. महाराष्ट्र सीमावासीयांच्या मागे उभा राहील. कर्नाटक सांगते त्याप्रमाणे आम्हीही इंच-इंच लढू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. सर्व कामकाज बाजूला ठेवून ठराव मांडावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. दुसरा आठवडा सुरू असतानाही हा ठराव घेतला गेला नाही. महाराष्ट्र सरकार गप्प का? आज ठराव यायलाच हवा होता, अशी भूमिका पवारांनी मांडली. आपण बघ्याची भूमिका घेता कामा नये, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
#Karnataka #Maharashtra #BorderDispute #MVA #Nagpur #SushantSinghRajput #CooperHospital #AjitPawar #DevendraFadnavis #WinterSession #MaharashtraKarnataka