महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आहे. अशात नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील सीमावाद पेटताना पाहायला मिळाला. या प्रकरणी आता विधानसभेत ठराव मांडण्यात येणार आहे. यावरून संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर निशाणा साधला.