पुणे शहरात स्वराज्य संघटनेच्या वतीने चालू वर्षाचा शेवट आणि नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर बालगंधर्व रंगमंदिर चौकात 'दारू नको, दुध प्या, आपले आरोग्य जपुया' हा अभिनव उपक्रम पार पडला. या उपक्रमांतर्गत जवळपास २०० लीटर मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. 'दारू नको, दुध प्या, आपण आपले आरोग्य जपुया,' स्वराज्य संघटनेचा विजय असो, दारूला नकार, दुधाला होकार अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.