लता मंगेशकर यांचे निधन ते सिद्धू मूवीसेला यांची हत्या; २०२२ सालात काय काय घडलं?
२०२२ हे वर्ष अनेक वर्षांनी विशेष राहिले. या वर्षात देशाच्या प्रगतीसाठी पोषक असणाऱ्या अनेक घटना घडल्या. असे असले तरी या वर्षी कधीही विसरता येणार नाहीत, अशी दु:खद घटनादेखील घडल्या. या वर्षात कला, राजकारण, उद्योग आदी क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे निधन झाले. यामध्ये जगप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, पंडित बिरजू महाराज, पार्श्वगायक बप्पी लाहिरी, उद्योगपती राहुल बजाज, गायक केके यांच्यासह अन्य बड्या व्यक्तींचा समावेश आहे.