Pune Metro: पुणे मेट्रोच्या पुढील टप्प्याची चाचणी पूर्ण; फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट दरम्यान ट्रायल रन
वनाझ ते गरवारे महाविद्यालय रेल्वेस्टेशन दरम्यानची सेवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुरू झालेली आहे. त्याच मेट्रोच्या पुढच्या टप्प्याची चाचणी पार पडली आहे, अशी माहिती महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दिक्षितांनी यांनी दिली आहे. चाचणी झालेल्या टप्प्यातील 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा दिक्षितांनी केलाय. पुणे मेट्रोने फुगेवाडी (पिंपरी चिंचवड मनपा हद्द) ते सिव्हिल कोर्ट (पुणे मनपा हद्द) आणि सिव्हिल कोर्ट (उन्नत स्थानक) ते वनाझ (उन्नत स्थानक) या मार्गिकांवर ट्रायल रन घेतली आहे. एका अर्थाने नव्या वर्षाचे पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना हे एक गिफ्ट मिळणार आहे. #marathi #pune #metro #pimprichinchwad #chinchwad #pimpri
रिपोर्टर: कृष्णा पांचाळ