छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत, या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर राज्यात एकच वादंग उठला आहे. या विधानाचा तीव्र निषेध सर्वत्र व्यक्त केला जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॅा. अमोल कोल्हे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. एका व्हिडिओद्वारे त्यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक? याबद्दलची आपली भूमिका मांडली आहे.