"शिवसेना आणि आमचा निर्णय झाला आहे, आता केवळ आम्हाला एकत्रितपणे जाहीर करायचं बाकी आहे"" काल प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य करून मागील १ महिन्यापासून सुरु असलेल्या राजकीय अनुमानावर शिक्कामोर्तब केलं. गेल्या नोव्हेंबर मध्ये पप्रबोधनकार ठाकरेंशी संबंधित एका कार्यक्रमाच्या वेळी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर दिसले. याच कार्यक्रमात ठाकरेंनी आंबेडकरांना युती करण्याची जाहीर सादसुद्धा घातली. त्यानंतर या दोघांची अनेक वेळा भेट झाली. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांच्या बोलण्या सुरु आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचं हे कालच वक्तव्य भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार हेच सांगणार आहे. आणि या युतीची पहिली टेस्ट असणारेय ती म्हणजे आगामी BMC ची निवडणूक.
प्रकाश आंबेडकरांनी तर जेवढ्या जागा शिवसेना द्यद्यला तयार आहे तेवढ्या जागा आम्हाला मान्य आहेत असंसुद्धा जाहीर केलय. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात हा एक नवीन प्रयोग आपल्याला पाहायला मिळणार आहे.
पण शिवसेना- वंचित युतीचा फायदा होईल का? झाला तर तो कोणाला होईल? हे नवीन समीकरण महाविकास आघाडीत फिट बसेल का ? या सर्व प्रश्नांची उयत्तर आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोतच.
#UddhavThackeray #PrakashAmbedkar #SharadPawar #Shivsena #VanchitBahujanAghadi #MVA #HWNews #VBA #Maharashtra #Alliance #NCP #Congress