एकीकडे शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबतची लढाई निवडणूक आयोगासमोर सुरू असताना, दुसरीकडे ठाकरे गटाचं टेन्शनही वाढत चाललंय. कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पदाचा कार्यकाळ येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाची 5 वर्षे पूर्ण होत असून याच तारखेला त्यांची संघटनात्मक प्रमुख पदाची मुदत संपतेय. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुखपदाचं नेमकं काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
#UddhavThackeray #ShivSena #EknathShinde #ElectionCommission #EC #BalasahebThackeray #Maharashtra #BMCElection2022 #HWNews