सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना अमित देशमुख म्हणाले की, “तूर्त तरी सध्या महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाचं सरकार आहे, असं मानावं लागेल. हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे शांतता राखा कोर्ट सुरु होणार आहे. कोण कोणत्या पक्षात आहे, हा प्रश्न पडला आहे. पाच वर्षे चमत्कारिक राहिली. महाराष्ट्रात पहिलं अडीच दिवसांचं, दुसरं अडीच वर्षाचं आणि आता तिसऱ्या सरकारचा कार्यकाळ सुरु आहे. चौथं सरकार कधीही येऊ शकतं” अशी मिश्कील टीप्पणी अमित देशमुख यांनी केली.
#AmitDeshmukh #Shivsena #MahaVikasAghadi #bjp #latur